आमचे गाव - ओळख आणी संस्कृती

गावाचा इतिहास आणि सण

भारत हा देश कृषी प्रधान देश आहे. अनेक खेडयांनी मिळून गाव तयार झाले आहे. अनेक गावां पासून तालुके निर्माण झाले आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील कालदुर्गाच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य असे चहाडे गाव. वाघोबा घाटातील वाघोबा ह्या जागृत देवस्थांनापासून सुरू होत असलेले सूर्या नदीच्या किनार्‍यापर्यंत हे गाव पसरलेले आहे. ह्या गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे.

ग्रामपंचायतीची स्थापना १९५८ झाली असुन गावाची लोकसंख्या २२९३ असुन त्यापैकी ७०% लोकसंख्या ही आदिवासी जमातीची लोकसंख्या आहे. चहाडे ग्रामपंचायतीचे तालुक्यापासून चे अंतर ९ किमी. आहे. ग्रामपंचायत अंतर्गत ८ पाडे आहे. एकुण कुटुंब संख्या ५५८ असुन गावातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती, शेत मजुरी असुन त्याला जोड व्यवसाय म्हणून भाजीपाला लागवड, दुग्ध व्यवसाय, शेळी पालन व कुकुट पालन हे व्यवसाय केले जातात. गावात जिल्हापरिषद शाळा -४, माध्यमिक शाळा -१, अंगणवाडी ६ आहे. कुटूंबाना वैयक्तीक नळ जोडणी कनेक्शन दिली आहेत. सदरची चहाडे गावाची पाणी पुरवठा योजना ग्रा. पं. अजंर्गतअसूनती ची देखभाल दुरूस्ती ग्रा. पं. चहाडे करतआहे.'तसेच सन २०२४-२५ मध्ये ISO 9001:2015 चे मानंक ग्रा.प. चहाडे अंतर्गत मिळाले आहे. तसेच गावामध्ये कालमेघ या देवताची यात्रा मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. सर्व शासकीय योजना मध्ये ग्रामस्थांचा सर्कीय सहभाग आहे.

स्थानिक मंदिरे, वारसा स्थळे

गावाला वाघोबा–भिलोबा - मेघोबा सारखे देवस्थान, किल्ला व सौंदर्य स्थळ, छोटे-मोठे धबधबे, नाळे, ओढे लाभले आहेत.

लोककला, संगीत आणि परंपरा

पर्यटकांसाठी होम स्टे पर्याय

गौरवशाली व्यक्ती

संस्कृतीक कार्यक्रम आणि लोककला

स्थानिक पाककृती, हस्तकला , खास उत्पादने

FTO गटांची माहिती आणि त्यांचे कार्य

-