
श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री

श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे
माननीय मंत्री, ग्रामविकास

श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास

श्री. गणेश नाईक
मा.वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री,पालघर जिल्हा

श्री. मनोज रानडे (भा.प्र.से.)
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद पालघर

श्री.रविंद्र शिंदे
मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद पालघर

श्री. अशोक पाटील
मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.)
जिल्हा परिषद पालघर

श्री.संजय भोये
मा.गटविकास अधिकारी(ऊ.श्रे.)
पंचायत समिती पालघर
आमच्या बद्दल
"झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा"
चहाडे गाव
- चहाडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.पालघर रेल्वे स्थानकापासून मनोर राज्य महामार्गावर १० किमी अंतरावर हे गाव स्थित आहे.वाघोबा खिंड पार केल्यानंतर लगेचच ह्या गावाची हद्द चालू होते.
- येथे हिवाळ्यात थंडगार वातावरण असते आणि वाघोबा खिंडीतून जाताना भरपूर धुके अनुभवायला मिळते. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे जागोजागी झरे तयार झालेले असतात आणि त्यामध्ये नैसर्गिकरीत्या मासे पैदास होते.उन्हाळ्यात येथे उष्ण हवामान असते.
- हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६६८ कुटुंबे राहतात. एकूण २२९३ लोकसंख्येपैकी ११६० पुरुष तर ११३३ महिला आहेत.
येथे प्राथमिक शिक्षणाची सोय आहे.गावात सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक, उच्च शिक्षण तसेच न्यायालयीन कामकाज, महसूल कामकाजासाठी पालघर येथे जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. खरीप हंगामातील भातशेती, नागलीशेती बरोबरच रब्बी हंगामात फुलभाज्या, फळभाज्या, पालेभाज्या ह्यांचे उत्पादन घेतले जाते. सूर्या नदी गावाजवळून वाहत असल्याने आणि बारमाही पाणी उपलब्ध झाल्याने काकडी, पडवळ,दुधी,गलका, कारले, केळी, आळू,शिराळा, कोबी, कांदा, मिरची ह्यांचे भरपूर प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.येथे सगळ्या परिसरात भात पिकत असल्याने परंपरेने तेच मुख्य अन्न आहे. रोजच्या जेवणासह सण, उत्सव, प्रथा, परंपरा यात भाताचे स्थान अनन्यसाधारण आहे. ताटात घरी पिकविलेल्या भातावर माशाचे कालवण पडल्यावरच येथील माणसांचे पोट भरते. भात किंवा तांदळापासून बनविलेले अनेक पदार्थ आहारात वापरतात.कणेरी, रवळी,रोळी, थालकुली, सानं, पोवं, ओतवल्याची भाकर, पानोल्या, पानमोड्या, पीठीचे लाडू, कोंडी, पापड्या, कुरडया, खरवड्या हे सगळे पदार्थ तांदूळापासून बनविले जातात.
लोकसंख्या
कुटूंब संख्या
महसूल गाव
वार्ड
क्षेत्रफळ(चौ.किमी)
जि.प.शाळा
अंगणवाडी
ग्रामपंचायत कमिटी
पुरस्कार
महत्वाचे संपर्क क्रमांक
नागरिक संपर्क केंद्र
बाल हेल्पलाईन
महिला हेल्पलाईन
गोपनीय गुन्हा तक्रार
आपत्कालीन हेल्पलाईन
पोलिस हेल्पलाईन











