ग्राम पायाभूत सुविधा

पाणीपुरवठा

ग्रामपंचायतीमध्ये चहाडे पाच गाव पाणीपुरवठा योजना तसेच प्रत्येक पाड्यात लघु पाणीपुरवठा योजना असून सौर उर्जेवर पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

चहाडे हद्दीत हर घर जल योजने अंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येत असून सदर पाणीपुरवठा योजना ही सोलार वर करण्यात आली आहे.

स्वच्छता

स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीची घंटा गाडी असून सदर घंटा गाडी रोज गावातील कचरा गोळा करून कचरा विलगीकरण शेड मध्ये ओला कचरा सुका कचरा विलगीकरण करण्यात येते

गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रती कुटुंब २ कचरकुंडी चे वाटप करण्यात आले आहे.

रस्ते आणि रस्त्यावरील दिवे

गावातील सर्व रस्ते मुख्य रस्त्याला जोडलेले आहे. सर्व पाड्यांमध्ये रस्ते आहेत

वाचनालय

ग्रामपंचायतीमध्ये सुसज्ज असे वाचनालय आहे

खेळाचे मैदान

ग्रामपंचायतीमध्ये सुसज्ज असे मैदान आहे

स्वयं-सहाय्यता गट केंद्र

ग्रामपंचायत हद्दी एकूण ४१ बचत गट असून सावली ग्रामसंघ आहे.

बसथांबे

चहाडे नाका व सज्जनपाडा येथे बस थांबा आहे

आरोग्य शिबीर आणि लसीकरण मोहीम

ग्रामपंचायत हद्दीत वेळोवेळी आरोग्य शिबीर लसीकरण शिबीर आयोजित केले जातात

आरोग्य केंद्र

ग्रामपंचायत पासुन ५०० मी अंतरावर आरोग्य केंद्र मासवण आहे

शाळा / अंगणवाडी

जिल्हा परिषद शाळा केंद्र चहाडे

जिल्हा परिषद शाळा आदिवासीपाडा

जिल्हा परिषद शाळा धानवीपाडा

जिल्हा परिषद शाळा सज्जनपाडा

अंगणवाडी केंद्र चहाडे नाका

अंगणवाडी केंद्र सज्जनपाडा